Kavita Sangrah Prakashan : दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते प्रा. संभाजी मलघे यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज : सिनेअभिनेते, प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे सर यांचा ‘अस्वस्थ भवताल’ नावाचा कविता संग्रह (Kavita Sangrah Prakashan) प्रसिद्ध झाला आहे.
आडकर फाउंडेशन इस्कॉन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृती प्रकाशन पुणे यांच्या वतीने ‘अस्वस्थ भवताल’ हा कवितासंग्रह पत्रकार भवन, पुणे येथे प्रकाशित करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन आडकर फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. मिलिंद जोशी, पुण्यभूषण फाऊंडेशनचे डॉ. सतीश देसाई, आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार भारत सरकार सचिन
ईटकर, ऍड. प्रमोद आडकर, अध्यक्ष आडकर फाउंडेशन पुणे, संस्कृती प्रकाशन पुणे यांच्या प्रकाशक सुनिताराजे पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी डॉ. संभाजी मलघे यांच्या कवितासंग्रहाचे तोंड भरून कौतुक केले आहे.  समाजामध्ये चालणारी खदखद व अस्वस्थता या कवितासंग्रहातून मांडल्याबत सर्व स्तरातून या पुस्तकाचे स्वागत होत आहे.
डॉ. सतीश देसाई यांनी ‘अस्वस्थ भवताल’ या कवितासंग्रहातील (Kavita Sangrah Prakashan) कवितांचे वाचन करून दाद मिळवली सदर कवितासंग्रह हा समाजासाठी प्रेरणादायी असून समाजाचा आरसा म्हणून सदर कवितासंग्रहाकडे सर्व महाराष्ट्राने पहावे, असे गौरवोद्गार दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी याप्रसंगी काढले.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे आधारस्तंभ माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी सदर कवितासंग्रहाचे स्वागत केले आहे. तसेच, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाहक चंद्रकांत शेट्ये, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड. देवेंद्र बुट्ये पाटील यांनी प्राध्यापक मलघे यांचे अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.