Pune : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब एट्रोसिटी, पोक्सो म्हणजे काय? आठ वर्षीय मुलाचा सवाल

एमपीसी न्यूज : पुण्यातील आळे फाटा येथे एका आठ वर्षीय (Pune) मुलावर एट्रोसिटी, पोक्सो तसेच दिव्यांग व्यक्तीवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपी असलेल्या आठ वर्षीय मुलाने एट्रोसिटी म्हणजे काय? पोक्सो म्हणजे काय? व्हिडिओ मार्फत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सवाल केल्याने हा विषय चर्चेत आला आहे. 

गुन्हा दाखल झालेला मुलगा आठ वर्षांचा असून त्यांच्या 19 वर्षीय अपंग आत्याबहिणीने जातिवाचक शिवीगाळ, मारहाण केल्याप्रकरणी  एट्रोसिटी, पोक्सो तसेच दिव्यांग व्यक्तीवर हल्ला केल्याप्रकरणी  आळे फाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी, की कुटुंबियांच्या वादातून हे प्रकरण घडले आहे. ज्या आठ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याच्या वडिलांच्या बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याने दोन्ही कुटुंबात तणावाचे वातावरण होते.

दोन्ही कुटुंब शेजारी राहत आहेत. त्यांच्यात ड्रेनेज लाइनवरुन वाद झाला.  यावेळी आठ वर्षीय मुलाने अपंग बहिणीला जातिवाचक शिवीगाळ तसेच मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलाच्या कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

Talegaon : नगरपरिषद प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात तळेगावात सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन

सदर प्रकाराबद्दल अल्पवयीन मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये मी  एट्रोसिटी, पोक्सो म्हणजे काय? असा सवाल वडिलांना, शाळेतील शिक्षकांना केला. परंतु मला याचे उत्तर कोणी दिले (Pune) नाही. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब एट्रोसिटी, पोक्सो म्हणजे काय? मला समजावून सांगाल का? असा सवाल केला होता.

तर, एवढ्या लहान वयात एट्रोसिटी, पोक्सो सारखे गुन्हे दाखल केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.