Talegaon : नगरपरिषद प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात तळेगावात सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन

एमपीसी न्यूज – तळेगाव नगरपरिषदेच्या (Talegaon) गलथान कारभाराविरोधात तळेगाव शहरात सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन करण्यात आले. जनसेवा विकास समितीच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.

यावेळी जनसेवा विकास समितीचे कार्याध्यक्ष कल्पेश भगत, प्रवक्ते मिलिंद अच्युत, जमीन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माऊली सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष दिनेश गवई, तळेगाव शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाळुंज, आर पी आय महिला अध्यक्ष करुणा सरोदे, शिवसेना शिंदे गटाचे संघटक सुनील उर्फ मुन्ना मोरे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष शंकर भेगडे, नगरसेवक सुनील कारंडे, रोहित लांघे, तळेगाव शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष योगेश पारगे, तळेगाव स्टेशन काँग्रेसचे अध्यक्ष समीर दाभाडे, साम्राज्य दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र थोरात ,सचिव किशोर कुलकर्णी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत चव्हाण, तळेगाव महिला काँग्रेस अध्यक्ष संगीता दुबे, आरपीआयचे सुनील पवार आदी उपस्थित होते.

नगरपरिषद प्रशासनाच्या आवारात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला. सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी दिलेले निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील यांनी स्वीकारले. लवकरात लवकर सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.

Chinchwad : गुगलवरील एक चुकीचा क्लिक पडू शकतो महागात

निवेदनात म्हटले आहे की, तांत्रिक मान्यता न घेता सुरू ठेवण्यात (Talegaon) आलेल्या कचरा कॉन्ट्रॅक्टमुळे दरमहा पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

गेली अनेक महिने पीएफ फंड व शासकीय इएसआय वैद्यकीय वर्गणी न भरल्यामुळे सफाई कामगारांचा जीव धोक्यात आलेला आहे. घंटागाडी वेळेवर कचरा गोळा करत नसल्याने कर्मचारी महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने पुरवली जात नसल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांची आरोग्य विषयक हेळसांड होत आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, नगरपरिषदेच्या माध्यमातून कचरा कॉन्ट्रॅक्ट विषयी समिती गठित करून सदर समितीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सुपूर्द करून तळेगावतील नागरिकांची भावना कळवावी.

तळेगाव शहरातील पावसाळ्यापूर्वी पाणी योजनेसाठी खोदून ठेवलेल्या रस्त्यांचे अपूर्ण ठेवण्यात आलेले काम कॉन्ट्रॅक्टरच्या खर्चातून पूर्ण करून घ्यावे. गल्लो गल्ली रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने तात्पुरत्या स्वरूपात रस्ते दुरुस्त करून घ्यावेत.

तळेगाव शहरात पथदिव्यांची दुरावस्था झाली आहे. काही ठिकाणी पथदिवे बंद आहेत. त्या संदर्भात उपाय योजना करावी. तळेगाव शहरात विशेषतः तळेगाव स्टेशन व शुभम कॉम्प्लेक्स चौकात बेकायदेशीर होत असलेल्या पार्किंगबाबत उपाययोजना करावी.

कॉलनी अंतर्गत गटारांची दुरुस्त झाली असल्याने सर्वत्र दुर्गंधीची तक्रार केली जात आहे, त्याबाबत कार्यवाही करावी. शहरातील उद्यानांची दुरावस्था झाल्याने उद्यान देखभाल व दुरुस्तीबाबत ठोस उपाययोजना करण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.