Wanwadi : वानवडीमध्ये दोन गटात राडा; तडीपार आरोपीचा वादात मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यातील वानवडी परिसरात (Wanwadi) दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. 

यामध्ये अजीम शेख उर्फ अंत्या याचा मृत्यू झाला आहे. तर खून झालेला अजीम हा पुण्यातील अनेक गुन्ह्यातील आरोपी असून तो सध्या तडीपार देखील होता.

Pune : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब एट्रोसिटी, पोक्सो म्हणजे काय? आठ वर्षीय मुलाचा सवाल

घरगुती वादातून दोन गटांमध्ये हा राडा झाला होता. यामुळे वानवडी परिसरात (Wanwadi) तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मध्यस्थी करत हा दोन गटातील वाद मिटवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.