Today’s Horoscope 18 August 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 18 August 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शुक्रवार.

18.08.2023.

शुभाशुभ विचार – उत्तम दिवस

आज विशेष – साधारण दिवस

राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – पूर्वा फाल्गुनी 22.57  पर्यंत नंतर उत्तरा फाल्गुनी.

चंद्र राशी – सिंह.

—————————————-
मेष – ( शुभ रंग- आकाशी )

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ मिळेल. दुपारनंतर काही किचकट प्रश्न सहजच सुटून जातील.असाध्य आजारावर डॉक्टरांना अचूक उपाय सापडेल.
वृषभ (शुभ रंग- राखाडी)

व्यापार उद्योगास चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर ठाम राहणार आहात. स्थावरची खरेदी विक्री फायद्यात राहील. घर सजावटीस गृहिणी प्राधान्य देतील.

मिथुन ( शुभ रंग- हिरवा)

नवीन व्यवसायात आपल्या मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. अति आत्मविश्वासही आज नुकसानास कारणीभूत होऊ शकतो. घराबाहेर वावरताना रागावर ताबा ठेवा.

कर्क (शुभ रंग- पांढरा)

आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे. आज अनावश्यक खर्च टाळायला हवा. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा मोठा खर्च उद्भवेल. वृद्धांनी तळपायांची काळजी घ्यायला हवी.

सिंह (शुभ रंग- मरून)

नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदरच करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. वाहतुकीचे नियम तंतोतंत पाळा.

कन्या ( शुभ रंग- निळा)

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. आज ज्येष्ठांची पावले सत्संगाकडे आपोआपच वळतील.

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

नोकरीच्या ठिकाणी आज तुम्ही वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. मोठा भाऊ आज तुम्हाला योग्य सल्ले देईल.

वृश्चिक (शुभ रंग- भगवा)

आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य देणार आहात. इतरांच्या कामासाठी आपल्या अधिकारांचा वापर कराल. रखडलेली शासकीय कामे गती घेतील.

धनु- (शुभ रंग- डाळिंबी)
कार्यक्षेत्रात डोक्याला ताप देणाऱ्या काही घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ जितके विचारतील तितकेच बोला. फार खोलात शिरलात तर तुमच्या अडचणी वाढतील.

मकर ( शुभ रंग- चंदेरी)
कार्यक्षेत्रात नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आज दिवस योग्य नाही. आज झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. वैवाहिक जीवनात फार अपेक्षा करून चालणार नाहीत. सामान्य दिवस.

कुंभ (शुभ रंग – मोतिया)
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. भागीदारीत घेण्या देण्याचे व्यवहार चोख असलेले बरे.

मीन -(शुभ रंग – केशरी)
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या मर्जीत राहाल. तब्येत थोडी नरमच राहील. जुनी दुखणी अंगावर काढू नका. वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीचा विशेष नको.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.