Pune Corona Update : सावधान ! शहरात आज 1086 रुग्णांची नोंद; 795 रुग्णांना डिस्चार्ज, 6 मृत्यू

एमपीसी न्यूज : शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून मंगळवारी दिवसभरात 1086 रुग्णांची वाढ झाली, तर बरे झालेल्या 795 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील 321 रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या 7 हजार 20 झाली आहे.

शहरात सध्या 723 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात 6 मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 4 हजार 903 झाली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात एकूण 795 रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 98 हजार 246  झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या 2 लाख 10 हजार 169  झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या 7  हजार 20  झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.