Pune Crime : शिवाजीनगर परिसरात स्वयंघोषित दादाचा हातात कोयता घेऊन धुमाकूळ

एमपीसी न्यूज – पुणे शहराचा शिवाजीनगर परिसरातील पाटील इस्टेट मध्ये एका स्वयंघोषित दादाने हातात कोयता घेऊन धुमाकूळ घातल्याचा प्रकार उघडकीस आला. या दादाने अचानकपणे एका तरुणावर कोयत्याने वार केले. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

अक्षय पवार आणि मीरा कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी आकाश नवले यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. यापूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले होते. दोन दिवसापूर्वी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आरोपी हे पाटील इस्टेट परिसरात गेले आणि त्यांनी फिर्यादीला, या परिसरातला मी दादा आहे तुला माहीत नाही का? असे म्हणत कोयता घेऊन त्याच्या मागे लागले.

या संपूर्ण प्रकारानंतर शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली होती. नागरिकांनी आपली घरे बंद केली होती. आरोपीने फिर्यादी ला गाठत त्याच्यावर कोयत्याने वार केले. जखमी झालेल्या फिर्यादीवरून रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.