Pune Crime : डीपी ट्रांसफार्मर चोरीतील फरार आरोपी अखेर जेरबंद

एमपीसी न्यूज : यवत पोलीस ठाण्याच्या (Pune Crime) गुन्हे शोध पथकाने वाळकी, तालुका दौंड येथे कारवाई करून डीपी ट्रांसफार्मर चोरीतील तब्बल 24 गुन्ह्यातील फरार आरोपीला जेरबंद केले आहे. सागर पवार (वय 25 वर्षे, रा. वाळकी, मूळ रा. अहमदनगर) याला यवत गुन्हे शोध पथकाने अटक केले आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये 2021 ते 2022 पर्यंत डीपी ट्रान्सफॉर्मर चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. त्यावेळी यवत गुन्हे शोध पथकाने पुणे ग्रामीण जिल्ह्यातील डीपी ट्रान्सफॉर्मर चोरीचे 46 गुन्हे उघडकीस आणून पाच टोळ्या जेरबंद करून 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यापैकी दत्ता शिंदे (रा. दौंड) याच्या टोळीकडून 28 गुन्हे उघडकीस आणण्यात आले होते. तेव्हापासून सागर पवार हा फरार होता. तो वाळकीमध्ये येणार असल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळाल्यानंतर पथकाने वाळकी येथे जाऊन (Pune Crime) सापळा रचून त्याला अटक केली.

ही कामगिरी अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, आनंद भोईटे, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिकारी, यशवंत गवारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस हवालदार निलेश कदम, पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड, पोलीस हवालदार अक्षय यादव व होमगार्ड कमलेश भालेराव यांनी केली.

Today’s Horoscope 14 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.