Pune Crime News : अपॉइंटमेंट घेऊन सुरु असणाऱ्या डेक्कन येथील ब्युटी सेंटरवर कारवाई

एमपीसी न्यूज – शासकीय आदेशाचे उल्लंघन करून व्ही एल सी सी वेलनेस अँड ब्युटी सेंटर या सलून डेक्कन पोलिसांनी कारवाई केली. या ब्युटी सेंटरच्या मॅनेजर विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडारकर रस्त्यावर असलेले व्ही एल सी सी वेलनेस अँड ब्युटी सेंटर हे सलून माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर डेक्कन पोलिसांच्या एका पथकाने या माहितीची खातरजमा करून या ब्युटी सेंटरवर छापा टाकला. यावेळी पोलिसांना आतमध्ये सेवा सुरू असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, ग्राहकांची अपॉइंटमेंट घेऊन या ठिकाणी सेवा पुरविण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्लीमिग हेड मॅनेजर यांनी हेड ऑफिस कडून सूचना आल्यामुळे ब्युटी सेंटर चालू ठेवल्याचे सांगितले. सध्या कोरोना संसर्गजन्य विषाणू आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महाराष्ट्र शासन तसेच पुणे महानगरपालिका यांच्याकडून पारित करण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.