Pune crime News : खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्याला अटक

एमपीसीन्यूज : बड्या व्यक्तीला फोन करून खासदार अमोल कोल्हे ( Mp Amol Kolhe) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Bjp State President chandrakant patil) बोलत असल्याचे सांगून त्यांची आर्थिक फसवणूक ( Financial cheating)  करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक ( Arrest)  केली आहे.

विशाल अरुण शेंडगे (वय 32, रा. टिळेकर नगर, कोंढवा ) असे अटक केल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार सुरेश बंडू कांबळे (रा. गंज पेठ ) याचाही गुन्हे शाखेकडून ( Crime Branch)  शोध घेतला जात आहे. आरोपींनी लॉकडाऊन ( Lockdown) काळात अनेक व्यक्तींना फोन करून त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल शेंडगे याने लॉकडाऊन काळामध्ये गेरा बिल्डर्सचे संचालक रोहित कुमार गेरा ( रा., वानवडी) यांना खासदार अमोल कोल्हे बोलत आहे, अशी बतावणी केली.

लॉकडाउनमध्ये लोकांना काहीतरी मदत करा, अशी तोतयागिरी करून संबंधिताने त्यांना फोन केला होता. त्याशिवाय अशाचप्रकारचे 7 गुन्हे केले होते. त्यासंदर्भात गुन्हे शाखेकडून तपास सुरू असताना त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.