Pune Crime News : पार्टनरशिपच्या नावाखाली उद्योजकाची 17 लाखांचा अपहार

एमपीसीन्यूज : इव्हेंन्टस मॅनेजमेंटच्या व्यवसायात भागीदारी करत असलेल्या उद्याेजकाची दाेन जणांनी 17 लाख 62 हजार रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघा जणांवर सिंहगड पाेलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अभिजीत उभे (वय-31,रा.धायरीगाव,पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. अभिजीत उभे यांनी जानेवारी 2019 पासून ओळखीचे दाेन व्यक्तीं साेबत ‘द राॅक इव्हेंटस’ या नावाने इव्हेंटस मॅनेजमेंट’ व्यवसाय सुरु केला. त्यात उभे यांना 40 टक्के भागीदारी देण्याचे अमिष दाखवून इतर दाेघांनी त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून वेळाेवेळी 17 लाख 62 हजार रुपये गुंतवणुक करण्यास भाग पाडले.

परंतु, त्यांना 40 टक्के भागीदारी न देता किंवा त्यांचे गुंतवणुकीचे पैसे परत न करता त्यांची फसवणुक केली आहे. सहाय्यक पाेलीस निरीक्षक एम. उमारे याबाबत पुढील तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.