Pune Crime News : दीपक मारटकर खून प्रकरणात कुख्यात गुंड बापू नायरला अटक

एमपीसीन्यूज : पुण्यातील भाजपचे युवासेना पदाधिकारी दीपक मारटकर खून प्रकरणात फरासखाना पोलिसांनी गुंड बापू नायर याला अटक केली. कारागृहातून त्याला अटक करण्यात आली. मारटकर खून प्रकरणात फरासखाना पोलिसांनी यापूर्वी दहा जणांना अटक करून त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई केलेली आहे.

मारटकर खून प्रकरणाचा तपास चालू असताना यामध्ये कुख्यात गुंड बापू नायर याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. मारटकर यांचा खून करण्यापूर्वी यातील आरोपी बापू नायरला भेटण्यासाठी ससून रुग्णालयात गेले होते.

बापू नायर टोळीतील गुंड आणि सध्या टोळीचा सूत्रधार स्वप्निल मोडवे याला फरासखाना पोलिसांनी कराड येथून अटकही केली होती.

बापू नायर सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. दीपक मारटकर यांचा खून होण्यापूर्वी तो ससून रुग्णालयात भरती झाला होता. याचवेळी मारटकर खून प्रकरणातील आरोपी त्याला ससून रुग्णालयात भेटले होते.

दरम्यान, यावेळी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांनी हलगर्जीपणा दाखवल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.