Pune Crime News : दुचाकी, मोबाईल चोरणारे दोघे अटकेत;बंडगार्डन पोलीसांनी आवळल्या मुसक्या

एमपीसी न्यूज – जबरी चोरी आणि वाहन चोरी करणार्या दोन जणांना बंडगार्डन पोलीसांनी अटक केली. त्याशिवाय त्यांच्याकडून चार मोबाईल,९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच वाहन चोरीचे दहा गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीसांना यश आले आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी – पुणे स्टेशनवरील बिट मार्शल पोलीस अंमलदार धुलागुडे हे स्टेशन परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी एस.टी. स्टॅंण्डसमोरील टपरींच्या आडबाजूला थांबून दोन जण संशयितरित्या उभे असल्याचे दिसले. त्यांनी लगेच तपास पथकाचे प्रभारी अधिकारी राहूल पवार यांना फोनवरून माहीती दिली.

 

काही वेळानंतर तपास पथकातील प्रताप गायकवाड व हरिष मोरे संबंधित ठिकाणी पोहचले. त्यानंतर ते संशयितांच्या दिशेने जात असताना त्यांना ते पोलीस असल्याचे लक्षात आल्याने दोघांपैकी एक जण दूचाकी सोडून पळून गेला, तर अन्य एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले. दिनेश हरकाबहाद्दुर विका (वय २५, रा.भोसरी व तांगडे वस्ती, पिरंगुट, पुणे ) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

 

विका याच्याकडील दुचाकीबाबत तसेच पळून गेलेल्या व्यक्तीबाबत चौकशी केली असता त्याने असमाधानकारक उत्तरे दिली. त्यानंतर त्याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी करता त्यांच्याकडील निळ्या रंगाची होंडा कंपनीची अक्टीवा (क्र. एमएच १२ टीएल ८३४०) बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये चोरीला गेल्याची नोंद आढळली. त्यानंतर विकाला अटक करण्यात आली.

 

दरम्यान, त्याचा पळून गेलेला मित्र आरोपी खंड्या याला भोसरी येथून अटक करण्यात आली. आरोपींनी त्यांच्या निखील नावाच्या मित्राच्या मदतीने ९ दुचाकी, ४ मोबाईल असा एकूण चार लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.