Pune Crime : आईच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या व्यक्तीचे घर चोरट्याने केले साफ

एमपीसी न्यूज : आईचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कार (Pune Crime) आणि पुढील विधी करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीच्या घरी जबरी चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा आणि लोखंडी कुलूप तोडून दोन लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

केसनंद येथे 26 ते 28 डिसेंबर 2022 या कालावधीत ही घटना घडली.. याप्रकरणी मायादेवी राजेंद्र यादव (वय 55) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी या केसनंद गावात राहतात. आईचे निधन झाल्यामुळे त्या पुण्यातील भवानी पेठ येथे गेल्या होत्या. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून हॉलमधील खिडकीचे लोखंडी गज (Pund Crime) कापून राहत्या घरात प्रवेश केला.

बेडरूम मधील लाकडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले 67 ग्रॅम वजनाचे दोन लाख 25 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Pune : बलात्काराची केस मागे घेण्यासाठी महिलेच्या अंगावर टाकला ज्वलनशील पदार्थ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.