Karve Nagar : नळ स्टॉप उड्डाण पुलावर अज्ञात वाहनाची धडक, तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : कर्वे रस्त्यावरील नळ स्टॉप येथे असणाऱ्या (Karve Nagar) उड्डाण पुलावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

विशाल संतोष बोराटे (वय 24, रा. जालना) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस हवालदार सिद्धाराम कोळी यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, विशाल बोराटे बुधवारी (Karve Nagar) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास डेक्कन कडून कर्वे रोडच्या दिशेने निघाला होता. यावेळी नळ स्टॉप येथील उड्डाण पुलावर अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली.. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. डेक्कन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.