Khandala : नीरा नदीत सापडला पुण्यातील तरुणीचा मृतदेह; आत्महत्या की घातपात तपास सुरू

एमपीसी न्यूज : पुण्यातील एका वीस वर्षीय तरुणीचा निरा (Khandala) नदीमध्ये मृतदेह आढळला आहे. खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी येथे असणाऱ्या नीरा नदीच्या पात्रात रविवारी हा मृतदेह सापडला.

सडलेल्या अवस्थेत असलेल्या या मृतदेहाची ओळख पोलिसांनी पटवली. नेहा शरद पिलाने (वय 20) असे मयत तरुणीचे नाव आहे. या तरुणीने आत्महत्या केली की तिच्यासोबत घातपात झाला याचा तपास आता शिरवळ पोलीस करत आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की मकर संक्रांतीच्या दिवशी नीरा नदी पात्रात एक अनोळखी मृतदेह सापडला होता. शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये सुरुवातीला याप्रकरणी आकस्मिक मयत म्हणून झाली होती. त्यानंतर शिरवळ पोलिसांनी 72 तासात या तरुणीची ओळख पटवली. तपास पथकाला ही तरुणी पुणे शहरातील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शिरवळ पोलिसांनी नेहा बेपत्ता असल्याची नोंद असलेल्या सहकार नगर पोलीस स्टेशन कडून तिच्या नातेवाईकांची माहिती घेतली.

शिरवळ पोलिसांनी तिच्या नातेवाईकाशी संपर्क साधून (Khandala) मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर आता नेहा पुण्यातून शिरवळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत कशी आली? तिने आत्महत्या केली की तिच्यासोबत घातपात झाला याचा तपास सहकार नगर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.