Pune: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी दररोज ‘योग” महत्त्वाचा- अदिती येवले

Pune: Daily 'Yoga' important for physical and mental health- Actress Aditi Yevale गेल्या अनेक वर्षांपासून मी नियमित योगा करते, लॉकडाऊनमध्ये पण न चुकता रोज सकाळी योगा करायचे

एमपीसी न्यूज- शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी दररोज योग करणे महत्वाचे असल्याचे अभिनेत्री अदिती येवले हिने सांगितले आहे. आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त अदितीने योग साधना केली व शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून दूर राहण्यासाठी दररोज योग करणे हा त्यासाठी अत्यंत सोपा आणि फायदेशीर उपाय असल्याचे तिने सांगितले.

अदिती म्हणाली की, गेल्या अनेक वर्षांपासून मी नियमित योगा करते, लॉकडाऊनमध्ये पण न चुकता रोज सकाळी योगा करायचे, त्यामुळे दिवसभर ताजेतवाने राहून स्वतःला फिट ठेवण्यास योगा अतिशय फायदेशीर ठरल्याचे मत अभिनेत्री अदिती येवलेने व्यक्त केले आहे.

कला क्षेत्रातली चढाओढ, ताणतणाव तसेच शुटिंगच्या वेळा सांभाळून स्वतःला फिट ठेवणे अशा अनेक गोष्टी कलाक्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांना सांभाळाव्या लागतात.

काही दिवसांपूर्वीच अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्तेमुळे संपूर्ण जग हळहळले. त्यामागचे कारण डिप्रेशन, ताणतणाव असे बोलले जात आहे. त्यामुळे यापासुन दूर राहण्यासाठी योग हा अतिशय फायदेशीर आहे. पाश्चिमात्य देशातही आता अनेकजण योगावर भर देत असल्याचे दिसत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.