Chinchwad: पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून रविवारी 56 जणांवर कारवाई

Chinchwad: Pimpri-Chinchwad police took action against 56 people on Sunday for violating rules of lockdown शहरात कोरोना बधितांची संख्या एक हजार 768 झाली आहे. त्यातील एक हजार 59 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 669 जणांवर उपचार सुरू आहेत.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी रविवारी (दि.21) 56 जणांवर कारवाई केली. शहरात कोरोनाचा कहर वाढत असून नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडत आहेत. त्यांच्याकडून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्यास पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी 92 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे शहरात कोरोना बधितांची संख्या एक हजार 768 झाली आहे. त्यातील एक हजार 59 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 669 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 31 जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात प्रशासनाने लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता दिली आहे. त्यामुळे नागरिक मोठ्यासंखेने घराबाहेर पडत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी पोषक स्थिती निर्माण होत आहे.

लॉकडाऊनचे नियम शिथिल करताना काही निर्बंध देखील प्रशासनाकडून घालण्यात आले आहेत. त्या निर्बंधांचे उल्लंघन केल्यास पोलीस नागरिकांवर कारवाई करीत आहेत. कोरोनाशी लढा सबंध जगभर सुरु असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन वेळोवेळी प्रशासनाकडून केले जात आहे.

रविवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार एमआयडीसी भोसरी (10), भोसरी (0), पिंपरी (0), चिंचवड (0), निगडी (0), आळंदी (0), चाकण (0), दिघी (0), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (7), वाकड (9), हिंजवडी (20), देहूरोड (1), तळेगाव दाभाडे (5), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (4), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (0) अशा एकूण 56 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.