Pune : सोसायटीची सीमा भिंत पडल्याने वाहनांचे नुकसान

एमपीसी न्यूज – भवानी पेठेतील एका सोसायटीची सीमा भिंत (Pune) पडल्यामुळे चार वाहनांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी (दि.13) दुपारी घडली. अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भवानी पेठ येथील एका सोसायटीची सीमा भिंत अचानक कोसळली.

Nigdi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बसवेश्वर महाराज पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण

त्यामुळे भिंतीलगत असलेल्या एक रिक्षाचा चक्काचूर झाला. तसेच दुचाकी, टेम्पोसह दोन हातगाड्यांचे नुकसान झाले. या घटनेत कोणी जखमी झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल (Pune) झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.