Pune News : सणासुदीच्या प्रसंगी ध्वनी प्रदूषणाचे नियम शिथिल , पुणे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

एमपीसी न्यूज : पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी 2023 या वर्षभरातील सण आणि उत्सव लक्षात घेता पुणे जिल्ह्यात ध्वनिक्षेपक आणि ध्वनिक्षेपक यंत्रणेच्या वापरावरील मर्यादा 15 दिवसांसाठी शिथिल करण्याचे आदेश जारी केले आहेत. (Pune News) केंद्र सरकारच्या ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) दुरुस्ती नियम, 2017, नुसार सभागृह, कम्युनिटी हॉल आणि बँक्वेट रूम यासारख्या बंद जागा वगळता 15 दिवसांपर्यंत सूट जाहीर करण्याचे अधिकार राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

पुणे जिल्ह्यात 19 फेब्रुवारी शिवजयंतीपासून, त्यानंतर 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, 1 मे महाराष्ट्र दिन आणि 23 ते 27 सप्टेंबर या गणपती उत्सवासाठी 15 दिवसांची सवलत दिली आहे . 28 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद आणि अनंत चतुर्दशी, 23 आणि 24 ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सव, 12 नोव्हेंबर रोजी दिवाळी, 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस आणि वर्षातील उर्वरित दोन दिवस महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी आवश्यकतेनुसार सूट दिली जाणार आहे.

Pune News : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; पण प्रचारात सहभागाची शक्यता कमी

लाऊडस्पीकर आणि लाऊडस्पीकर सिस्टीमचा वापर ध्वनीच्या विहित मर्यादेतच केला जाणे आवश्यक आहे आणि आवाज क्षेत्रासाठी निर्धारित केलेल्या धव्नी मर्यादेपेक्षा जास्त नसावा, (Pune News) असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. शांतता क्षेत्रात  ही सूट लागू होत नाही, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.