Shivsena : शिंदे गटाला ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ ठेवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश

एमपीसी न्यूज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी आनंदाची तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निराश करणारी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाचे नाव बदलून शिवसेना असे करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.  एवढेच नव्हे तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ कायम ठेवण्यात येणार असल्याचेही आयोगाने म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत सत्ता असताना बंडखोरी करून 40 मंत्र्यांसह ठाकरे घराण्याला राम राम केला. त्यानंतर सत्तासंघर्षाची लढाई सुरू झाली.

Pune News : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; पण प्रचारात सहभागाची शक्यता कमी

‘शिवसेना’ आमचीच म्हणत ठाकरे आणि शिंदे गटात चुरशीची लढत सुरू झाली. ही लढाई निवडणूक आयोगासमोर गेली आणि आज अखेर शिंदे यांनाच शिवसेना आणि शिवसेनेचे अधिकृत असे धनुष्यबाण चिन्ह मिळाले. त्यामुळे आता शिवसेनेचा वारसा हक्क असलेल्या उद्धव ठाकरे यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.