Pune : डॉ. कुमार विश्वास यांनी घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे दर्शन

एमपीसी न्यूज – अयोध्येतील रामजन्मभूमीवर (Pune) शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामांचे मंदिर साकारत असून, रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येत्या 22 जानेवारीला होत आहे. या प्रभू श्रीरामांचे दर्शन आपल्या अमोघ वाणीतून घडवणारे कवी डॉ. कुमार विश्वास यांनी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात येऊन श्रींची आरती करून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट कडून यथोचित सन्मान करण्यात आला.

Talegaon : शेअर्समध्ये पैसे गुंतवण्यास सांगून तरुणाची अडीच लाखांची फसवणूक

यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे (Pune) इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

youtube.com/watch?v=AZq9QmLmZgI

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.