Pune : श्री राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त दि पूना मर्चंटस् चेंबरमध्ये धान्य, कडधान्य, ड्रायफ्रुटसच्या भव्य रांगोळीचे आयोजन

एमपीसी न्यूज – अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त (Pune) दि पूना मर्चंटस् चेंबरने त्यांच्या मार्केट यार्ड येथील सभागृहामध्ये धान्य, कडधान्य, डाळी आणि ड्रायफ्रुटस् ची भव्य रांगोळी काढली आहे. मार्केटयार्ड गुळ भूसार हा अन्न धान्याचा बाजार असल्याने अन्न-धान्याचे प्रतीक म्हणून या रांगोळीमध्ये धान्य, कडधान्य, डाळी, मिरची, सुका मेवा यांचा वापर केला आहे.

ही रांगोळी सामेवार दि. २२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० ते सायं. ६.०० वाजेपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खुली ठेवण्यात येणार आहे. तरी सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. तसेच सोमवार दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्यानिमित्त दि पूना मर्चंटस् चेंबरतर्फे मार्केट यार्डमध्ये सजवलेल्या वाहनांमध्ये शोभा यात्रेचे आयोजन केले असून त्यादरम्यान प्रसादाचे वाटप केले जाणार आहे.

Pune : डॉ. कुमार विश्वास यांनी घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे दर्शन

ही रांगोळी सोमनाथ आर्टस् व सविताआर्टस् तर्फे सोमनाथ भोंगळे, अभिषेक शिंदे व (Pune) सविता चांदगुडे यांनी काढली आहे, अशी माहिती दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी दिली.

youtube.com/watch?v=AZq9QmLmZgI

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.