Pune : वनदेवी मंदिराच्या समोर पाईपलाईन बदलण्याचे काम सुरू – स्वप्नील दुधाने

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या (Pune) प्रभाग क्रमांक 31 मधील वनदेवी मंदिराच्या समोर बाळासाहेब बराटे यांच्या मिळकतीलगत आणि सोसायटीच्या नजीक असणारी ड्रेनेज पाईपलाईन खराब झाल्याने सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत होता. तसेच या ठिकाणी पाणी साठत असल्याने दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला होता.

पाईपलाईन बदलण्याचे काम गेल्या दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले असून आज स्थानिक रहिवासी बाळासाहेब बराटे आणि वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे ड्रेनेज विभागाचे कनिष्ठ अभियंता दिवटे यांच्यासह कामाची पाहणी केली आणि योग्य त्या सूचना केल्या.

Pune : श्री राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त दि पूना मर्चंटस् चेंबरमध्ये धान्य, कडधान्य, ड्रायफ्रुटसच्या भव्य रांगोळीचे आयोजन

हे काम लवकरच पूर्णत्वास जात असून नागरिकांना (Pune) नाहक त्रास सहन करावा लागणार नाही, असा विश्वास वाटतो, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी दिली.

या अनुषंगाने नागरिकांनी संपर्क साधला असता, प्रत्यक्ष जागी जाऊन भेट दिली आणि त्वरित वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे ड्रेनेज विभागाचे कनिष्ठ अभियंता दिवटे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी दिवटे यांनी प्रत्यक्ष जागी नेऊन ड्रेनेज पाईपलाईन बदलण्यात यावी, अशी विनंती केली, असेही स्वप्नील दुधाने यांनी सांगितले.

youtube.com/watch?v=AZq9QmLmZgI

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.