Talegaon : शेअर्समध्ये पैसे गुंतवण्यास सांगून तरुणाची अडीच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – शेअर्समध्ये पैसे गुंतवण्यास (Talegaon) सांगून तरुणाची तब्बल अडीच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ही घटना 24 सप्टेंबर 2023 ते 6 ऑक्टोबर 2023 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडली.

याप्रकरणी अभिजीत समाधान सुशीर (वय 33, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.) फिर्याद दिली आहे. यावरून एक महिला व कार्तिकेयन गणेश या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : जुन्या वादातून अल्पवयीन मुलाला मारहाण, एकाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी डॅडी इंटरप्राईजेस या कंपनी द्वारे संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचे अमिष दाखवले. यासाठी त्यांनी फिर्यादी कडून वेगवेगळ्या ऑनलाइन पद्धतीने तब्बल दोन लाख 52 हजार रुपये घेतले. मात्र याचा आतापर्यंत कोणताही परतावा न देता फिर्यादी यांची फसवणूक करण्यात आली. यानुसार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Talegaon) केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

youtube.com/watch?v=AZq9QmLmZgI

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.