Pune : रस्त्यावर वाहणाऱ्या मैला पाण्याच्या ठिकाणी ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण

एमपीसी न्यूज – सततच्या पाठपुराव्याने कित्येक वर्ष रस्त्यावर (Pune) वाहणाऱ्या मैला पाण्याच्या ठिकाणी ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते पराग ढेणे आणि अर्चना ढेणे यांनी दिली.

गेली अनेक वर्ष नवज्योत मित्र मंडळाच्या मागील बाजूपासून निळ वादळ चौकापर्यंत मैलापाणी अक्षरशः धबधब्याप्रमाणे वाहत होते. या संदर्भात येथील नागरिकांनी जनसंपर्क कार्यालयाला भेट देत सदर ठिकाणी नवीन ड्रेनेज लाईनचे काम करून मिळावे, अशी विनंती केली होती. या ठिकाणी धबधब्याप्रमाणे वाहणाऱ्या मैला पाण्यावर उपयोजना करणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे होते.

TDR : टीडीआर प्रकरणी आपचे महापालिकेसमोर आंदोलन; आयुक्तांच्या प्रतिमेला नकली नोटांचा हार घालून केला निषेध

या संदर्भात वारजे – कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयास भेट देत नवीन ड्रेनेज लाईन चे काम करून (Pune) मिळावे, असे निवेदन देण्यात आले होते. या निवेदनांतर्गत गेले सहा महिने पाठपुरावा देखील सुरू होता. अखेर अत्यावश्यक असणाऱ्या या कामाची पूर्तता करण्यात आली आणि महानगरपालिकेमार्फत या ठिकाणी नवीन ड्रेनेज लाईनचे काम करण्यात आले. महानगरपालिकेतील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानत असल्याचे पराग ढेणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.