TDR : टीडीआर प्रकरणी आपचे महापालिकेसमोर आंदोलन; आयुक्तांच्या प्रतिमेला नकली नोटांचा हार घालून केला निषेध

एमपीसी न्यूज – वाकडमधील कथित टीडीआर घोटाळ्याप्रकरणी (TDR) आम आदमी पार्टीने महापालिका मुख्याल्यासमोर आज (शुक्रवारी) आंदोलन केले. आयुक्त शेखर सिंह, शहर अभियंता मकरंद निकम, नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड यांच्या प्रतिमेस नोटांचा हार घालून निषेध करण्यात आला.

आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताश्यांच्या गजरात अधिकाऱ्यांच्या प्रतिमेला खोट्या नोटांचा हार चढवला, टीडीआर घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. जॉनी जॉनी यस पप्पा!!, लूटिंग पालिका, नो पप्पा!!टेलिंग लाइज !! नो पप्पा!! टीडीआर घोटाळा ₹₹ हा हा हा हा हा हा !! अशा घोषणा देत आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.

Pimpri : कायम विद्यार्थ्याच्या भूमिकेत राहून नव्या गोष्टी आत्मसात करत रहा – चेतन भगत

महापालिकेतील निर्णयांची कॅग (CAG) मार्फत चौकशी करण्यात यावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास खात्याचे देखील मंत्री असल्यामुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे लवकरात लवकर त्यांनी त्याचे स्पष्टीकरण देऊन सनदी अधिकाऱ्यांची (SIT) टीम बनवून सदर प्रकरणाची चौकशी करावी. आयुक्त शेखर सिंह तसेच नगररचना व विकास, बांधकाम परवाना, स्थापत्य च्या सर्व अधिकाऱ्यांनी SIT मार्फत चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावे. 2017 साला नंतर महापालिका हद्दीतील सर्व टीडीआर प्रकरणांची (SIT) मार्फत (TDR) चौकशी करण्यात यावी. भूखंड मालक मे. विलास जावडेकर इन्फिनिटी प्रा.लि. यांना दिलेला टी.डी.आर रद्द करण्यात यावा. टंडन सोल्युशन प्रा.लि.या सल्लागारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.