Delhi : वाचनाकडे तरुणांचा ओढा वाढवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल – विनोद तावडे 

एमपीसी न्यूज – वाचनाकडे तरुणांचा ओढा वाढवण्यासाठी प्रयत्न करावा ( Delhi ) लागेल. त्यासाठी डिजिटल माध्यमांकडून मुद्रित माध्यमांकडे युवकांना वळविण्यासाठी विविध संस्थांना बरोबर घेऊन राष्ट्रीय पुस्तक न्यसने वाचनाची चळवळ निर्माण करावी, अशी अपेक्षा भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी केली.

नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर 49 व्या जागतिक पुस्तक महोत्सवात ज्येष्ठ लेखिका श्यामा घोणसे लिखित पुणे पुस्तक महोत्सवाच्या पुढाकाराने क्रांतदर्शी महात्मा बसवेश्वर, वर्षा परगट यांनी लिहिलेल्या श्रीकृष्ण या पुस्तकांचे प्रकाशन भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्या हस्ते झाले.

राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे या वेळी उपस्थित होते. तावडे म्हणाले, स्त्री पुरुष समानतेची शिकवण महात्मा बसवेश्वर यांनी फार पूर्वीच दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना लढाया पुरतेच मर्यादित न ठेवता व्यवस्थापनासारखे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे  पैलू शिकले पाहिजेत.

Chinchwad : फुलेनगरमध्ये श्री गणेश जन्मोत्सवनिमित्त हरिनाम सप्ताहाची सांगता

जागतिक पुस्तक महोत्सवातील दालनाबाबत राजेश पांडे म्हणाले,  साहित्य, वाचन याची चळवळ होण्यासाठी या वर्षापासून पुणे पुस्तक आयोजन करण्यात येत आहे. जागतिक पुस्तक महोत्सवात  दालनामुळे पुणे पुस्तक महोत्सव राष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यास मदत झाली आहे. मराठी भाषा दिनापासून वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वर्षभर उपक्रम राबवले जाणार येत आहेत.

पुणे पुस्तक महोत्सवाच्या यशाच्या पार्श्वभुमीवर याच महोत्सवाची खास झलक आणि महोत्सवात नावाजलेले कार्यक्रम घेऊन महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभाग, जागतिक पुस्तक महोत्सव आणि पुणे पुस्तक महोत्सवाच्यावतीने शिववंदना आणि महाराष्ट्राची लोकधारा या खास कार्यक्रमांचे आज आयोजन करण्यात आले होते.

राज्यातील 150 कलाकारानी हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. महाराष्ट्राची समृद्ध लोककला, वारसा यांचा समावेश असणारा  गणेशवंदना, दिवली नृत्य, गजी नृत्य, कोळी गीत, दहीहंडी, ढेमसा / रेला नृत्य, लावणी, मंगळागौर, महाराष्ट्रगीत मेडली, पंढरीची वारी, गोंधळ, शिवराज्याभिषेक असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते.  महाराष्ट्राच्या परंपरेचा आनंद घेण्याची संधी या निमित्ताने जगभरातून ( Delhi ) आलेल्या साहित्य रसिकांना मिळाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.