Pune : चंद्रकांत पाटील यांचा मोतीबिंदूमुक्त कोथरुडचा संकल्प

800 रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी ,150 रुग्णांवर मोतिबिंदूची शस्त्रक्रिया 

एमपीसी न्यूज – राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय ( Pune ) कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मोतीबिंदूमुक्त कोथरुडचा संकल्प केला असून, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्त सुबोध हॉस्पीटलमध्ये 800 रुग्णांची मोफत डोळे तपासणी करण्यात आली, त्यापैकी 150  रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. 
मोतीबिंदू हे जगभरातील दृष्टीदोषाचे प्रमुख कारण आहे, त्यावर वेळीच उपचार न केल्यास, डोळ्यांचे कधीही भरुन न येणारे नुकसान होऊ शकते. मोतीबिंदू जितका जास्त काळ डोळ्यात असतो, तितका तो सरक्षितपणे आणि प्रभावीपणे काढणे अवघड असते. म्हणूनच लक्षणीय अशा मोतीबिंदूचे लवकरच निदान आणि त्यावर त्वरित उपचार होणे योग्य पद्धतीमध्ये अवश्यक असते. या शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील व्यक्तींना अडचणीचे असल्याने, बहुतांश वेळेच अशा घटकातील रुग्ण याकडे दुर्लक्ष करतात.

त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांच्या डोळ्याची योग्य पद्धतीने निगा राखली जावी, यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतीदिनानिमित्त मतदारसंघातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीराचे आयोजन केले होते.
कोथरुडमधील सुबोध हॉस्पिटलमध्ये या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात एकूण 800 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यापैकी 150 रुग्णांना मोतीबिंदूचे निदान झाले. या सर्वांवर सोमवार पासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी सर्व रुग्णांनी नामदार चंद्रकांत  पाटील यांचे आभार मानले असून, त्यांच्या कामावर समाधान ( Pune ) व्यक्त केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.