Pune News : उद्योजकाकडे जोखीम पत्करण्याची तयारी हवी – प्रमोद चौधरी

एमपीसी न्यूज – “कृषीसह आधुनिक तंत्रज्ञान व सेवा क्षेत्रात उद्योगाच्या मोठ्या संधी आहेत. मूलभूत शिक्षणनाविन्यग्राहकांची गरज ओळखण्याची क्षमता, (Pune News) नवकौशल्य व नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचीचांगली माणसे जोडण्याची कलाकठोर परिश्रमाची आणि जोखीम पत्करण्याची तयारी यातूनच चांगला उद्योजक होता येईल,” असे प्रतिपादन प्राज इंडस्ट्रीज चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी केले.उद्योगाबरोबरच सामाजिक जाणीव ठेवून काम करावेअसेही त्यांनी नमूद केले.

युवा पिढीतील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थी साहाय्यक समितीतर्फे आयोजित उद्योजकता विकास परिषदेत प्रमोद चौधरी बोलत होते. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कुलच्या गणेश सभागृहात झालेल्या या परिषदेला ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार यांनीही ऑनलाईन स्वरूपात मार्गदर्शन केले.

Pimpri News : ‘आंबा मोहोर संरक्षण आणि फळबाग व्यवस्थापन’ या राज्यस्तरीय कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या प्रसंगी समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, ज्येष्ठ विश्वस्त प्रा. भाऊसाहेब जाधव, सुप्रिया केळवकर, ज्योती गोगटे, तुषार रंजनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, परिषदेचे समन्वयक सुरेश उमाप आदी उपस्थित होते. मनीषा गोसावी, मंदार जोगळेकर, डॉ. हरीश पाटणकर, राजू इंगळे, शंकर बारवे, तुकाराम गायकवाड या माजी विद्यार्थी उद्योजकांनी आपापल्या उद्योगाचे सादरीकरण केले.

समितीतील आजी विद्यार्थ्यांनी उद्योजक झालेल्या माजी विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेऊन उद्योगाकडे वळावे, या उद्देशाने आयोजित परिषदेत 150 पेक्षा अधिक उद्योजक विद्यार्थी सहभागी झाले होते.अंगारिका मांडे ने सूत्रसंचालन  केले तर तुषार रंजनकर यांनी आभार मानले. यावेळी समितीच्या कॅलेंडरचे, (Pune News) तसेच ज्योती गोगटे यांनी लिहिलेल्या ‘बडींग आंत्रप्रेन्युअर आयडिया बुक’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. दुपारच्या सत्रात आजी विद्यार्थ्यांबरोबर उद्योजकांच्या संवाद व गटचर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.