Pune Fire : उत्तमनगरमध्ये 5 झोपड्यांना लागली आग; कोणतीही जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज : उत्तमनगर (Pune Fire News) एनडीएजवळ गेट नंबर 10 येथे पत्र्याचे शेड असलेल्या पाच झोपड्यांना आग लागल्याची घटना घडली. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून एकुण 4 अग्निशमन वाहने दाखल झाली असून आग आटोक्यात आली आहे. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

याबाबत प्राथमिक माहिती देताना गजानन पाथरूडकर(स्टेशन ड्युटी ऑफिसर, पुणे महानगरपालिका, अग्निशमन विभाग) यांनी सांगितले, की कंट्रोल रूमला आगीची वर्दी दुपारी 3.30 वाजता मिळाली. त्यानंतर वारजे, कोथरूड, नवले व पीएमआरडीए अग्निशमनगंगाच्या प्रत्येकी एक असे एकूण चार अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले. मी आणि स्टेशन ड्युटी ऑफिसर राजेश जगताप तसेच 15 ते 16 अग्निशमन कर्मचारी आग विझवण्याचे काम करत होतो. ते पुढे म्हणाले की, येथे नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये (एनडीए) बिगारी व हेल्परचे काम करणारे कामगार पत्र्याच्या झोपड्यामध्ये राहत आहेत. आग विझवण्यासाठी पत्रे उचकटून आतमध्ये पाण्याचा मारा करण्यात येत आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणीही जखमी झाले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.