Pimpri : दोन लाख रुपायांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटक

एमपीसी न्यूज – आरोपी न बनवण्याच्या (Pimpri) बोलीवर दोन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी आज (दि.30) गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

रोहित गणेश डोळस. (वय 31) असे अटक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांच्या भावाला आरोपी न करणे, तसेच अर्ज दिवाणी बाब म्हणून फाईल करण्याच्या बदल्यात डोळस यानी तक्रारदार व त्यांचे भावाकडे सुरुवातीला तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने डोळस यांना अटक केली आहे.

Pune : टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू

पोलिस अधीक्षक अमोल तांबे अप्पर अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भारत साळुंखे, संदीप वर्‍हाडे, पोलिस हवालदार मुकुंद अयाचीत, पोलिस कर्मचारी भूषण ठाकूर आणि चालक एएसआय जाधव यांनी पडताळणी करून गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील (Pimpri) तपास एसीबी पुणेचे अधिकारी करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.