Pune : टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर (Pune) टेम्पोची अज्ञात वाहनाला धडक दिल्याने टेम्पोमध्ये बसलेला इसम गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला. हा अपघात पुणे-मुंबई एक्सपर्सवेवर सोमाटणे गावच्या हद्दीत 21 डिसेंबर रोजी मध्यरात्री घडला आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार नामदेव दसाप्पा दाडेंकर यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.21) फिर्याद दिली असून टेम्पो चालक समीर पापाभाई सय्यद (रा. उर्से) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्य़ात आला आहे. तर, या अपघातात सुनिल एकनाथ पाचगे (वय 35) हे मयत झाले आहेत.

Pimpri News : मुलींच्या सुरक्षेसाठी शाळा-कॉलेजबाहेर गस्ती वाढवावी – दुर्गा ब्रिगेड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पो चालक (Pune) व मयत सुनिल टेम्पो (एमएच14 जीयु 3622) मधून हडपसर फुरसुंगी येथून निघाले होते. ते सोमाटणे जवळ येताच त्यांची अज्ञात वाहनाला मागून धडक बसली. यामध्ये सुनिल जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यावरून टेम्पो चालका विरोधात गुन्हा दाखल केला असून टेम्पो चालका विरोधात शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.