Pune : जादा परताव्याचे आमिष दाखवून सव्वा तीन कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे ( Pune) आमिष दाखवून एका तरुणासह मित्र आणि नातेवाईकांची सव्वा तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी दिगंबर पोपट गायकवाड (वय 38 , रा. आंबेगाव पठार) यांनी फिर्याद दिली असून  भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात हनुमंत तुकाराम मोरे (रा. यमुनानगर , सातारा), नामदेव अंकुश गायकवाड, अनिल चव्हाण (रा. मुन्नानगर, सातारा),सुरेश गोरख कुंभार व तीन महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hadapsar : डिलिव्हरी बाॅयला कोयत्याचा धाक दाखवून लुटले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी दिगंबर गायकवाड यांना फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास दर महिन्याला 20 टक्के रक्कम परतावा देण्याचे आमिष दाखवले. आरोपींनी त्यांची क्रिएशन ट्रेडर्स डेव्हलपर्स एलएलपी नावाची कंपनी आहे, असे सांगून फॉरेक्स ट्रेडिंगबाबत माहिती दिली.

फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीने केलेल्या गुंतवणुकीवर त्यांच्या बॅंक खात्यात तीन लाख 20हजार रुपये जमा केले. त्यानंतर फिर्यादी, त्यांचे मित्र आणि नातेवाईक अशा एकूण 20  जणांनी या कंपनीत दोन कोटी 85 लाखांची गुंतवणूक केली. तसेच, 40 लाख रोख स्वरूपात दिले. परंतु आरोपींनी कोणताही परतावा न देता तीन कोटी 25 लाख रुपयांची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.