Pune : फ्रेंडस क्रिकेट अ‍ॅकॅडमीने विजेते पद पटकाविले

एमपीसी न्यूज – बी ए स्पोटर्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी पुणे (Pune) यांनी आयोजित केलेल्या अंडर-12 चॅम्पियनशिप लीग स्पर्धेत फ्रेंडस क्रिकेट अ‍ॅकॅडमीने बी ए स्पोटर्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा 111 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले.

व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या मैदानावरती फ्रेंडस क्रिकेट अ‍ॅकॅडमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि 173 धावा केल्या. फ्रेंड्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या रुद्राक्ष जाधव याने 39 धावा केल्या. अर्क सोनवणे याने 26 धावा केल्या. शौर्य जाधव याने 27 धावा केल्या शार्दुल मुरकुटे याने 15 धावा केल्या. पृथ्वी पालनेने 13 धावा केल्या. अर्जुन शिंदेने 8 तर कृष्णाने 6 धावा केल्या.

Chinchwad Bye-Election : सुज्ञ मतदार अहंकारी राष्ट्रवादीला जागा दाखवेल – राहुल कलाटे

फ्रेंड्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या उत्कृष्ट गोलंदाजी पुढे बी ए स्पोर्ट्स क्रिकेट (Pune) अ‍ॅकॅडमीचा डाव अवघ्या 62 धावांमध्ये संपुष्टात आला. फ्रेंड्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या आर्यन खडकेने हॅट्रिक घेऊन सामनावीर म्हणून पुरस्कार पटकावला. मॅन ऑफ द सिरीजचा बहुमान शौर्य जाधव याने मिळवला. या स्पर्धेमध्ये सहा संघांनी भाग घेतला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.