Chinchwad Bye-Election : सुज्ञ मतदार अहंकारी राष्ट्रवादीला जागा दाखवेल – राहुल कलाटे

एमपीसी न्यूज – महापालिकेत भाजपची सत्ता असताना राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी भाजपबरोबर सेटिंग करून अनेक ठेके मिळविले. त्या बदल्यात पालिकेतील भ्रष्टाचाराकडे डोळेझाक केली. महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारीसाठी माझे नाव चर्चेत होते मात्र, (Chinchwad Bye-Election) ऐनवेळी मला राष्ट्रवादीतील काही नतदृष्टांच्या  कारवायांमुळे उमेदवारी नाकारण्यात आली. चिंचवड मतदार संघात आपली ताकद असल्याचा अहंकार राष्ट्रवादीला झाला आहे. अहंकारी राष्ट्रवादीला  सुज्ञ मतदार जागा दाखवेल असे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी म्हटले आहे.

अहंकारामुळेच राष्ट्रवादीची महापालिकेतील सत्ता गेली. आणि मला काय अहंकारी म्हणता असे शब्दात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना उत्तर देत कलाटे म्हणाले, मला अहंकारी असे संबोधणाऱ्या राष्ट्रवादीने आत्मपरीक्षण करावे. सन 2017 च्या महापालिका निवडणुकीत अति अहंकार आणि फाजील आत्मविश्वास, भ्रष्टाचार यामुळेच राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली. भाजपाच्या हाती माकडाच्या हाती यावे तसे कोलीत आले. हे जनतेला चांगले माहित आहे.

Moshi : मोशी येथे गांजासह तरुणाला अटक

मागील निवडणुकीत मी खुद्द लक्ष्मण जगताप समोर असताना त्यांच्या विरोधात एक लाख बारा हजार मते घेतली होती. त्यामुळे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने माझे नाव चर्चेत होते. मात्र ऐनवेळी मला राष्ट्रवादीतील काही नतदृष्टांच्या  कारवायांमुळे उमेदवारी नाकारण्यात आली. चिंचवड मतदार संघात आपली ताकद असल्याचा अहंकार राष्ट्रवादीला झाला आहे.

मतदारसंघातील मतदार सुज्ञ ,सुशिक्षित आहे हा मतदार राष्ट्रवादीला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा टोला कलाटे यांनी हाणला आहे. घोडामैदान फार लांब नाही, (Chinchwad Bye-Election) मला जेमतेम 20 हजार मते मिळतील असे म्हणणाऱ्यांना मतदानातून उत्तर मिळेल असेही कलाटे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.