Moshi : मोशी येथे गांजासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन (Moshi) करणाऱ्या एका तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 19) दुपारी पावणे तीन वाजता गायकवाड वस्ती, मोशी येथे करण्यात आली.

शोयब शालेशा मकानदार (वय 24, रा. मोशी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रणधीर माने यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Nigdi News : शिवरायांचे राज्य लोककल्याणकारी – राजेंद्र घावटे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोयब हा (Moshi) गायकवाड वस्ती, मोशी येथील इंद्रायणी नदीच्या कडेला गांजा सेवन करत असताना पोलिसांना आढळला. पोलिसांनी त्याच्याकडून गांजा आणि गांजा ओढण्याचे साहित्य जप्त करत त्याला अटक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.