Pune Crime : पिस्टल बाळगल्या प्रकरणी चौघांना अटक, दरोडा विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – कारमधून पिस्टल घेऊन जाणाऱ्या चौघांना दरोडा विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्टल, एक जिवंत काडतूस आणि कार असा एकूण (Pune Crime) 12 लाख 35 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि. 19) पहाटे तीन वाजता बावधन येथे करण्यात आली.

संदीप उर्फ भैय्या दशरथ तुपे (वय 27, रा. इंदापूर), किरण नवनाथ गोरे (वय 26, रा. वाकड), महेश शिवाजी कुंभारकर (वय 26, रा. वाकड), रोहन लक्ष्मण लोंढे (वय 22, रा. वाकड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई विनोद वीर यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : फ्रेंडस क्रिकेट अ‍ॅकॅडमीने विजेते पद पटकाविले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथे एका कारमधून चौघेजण जात असून त्यांच्याकडे पिस्टल असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली. (Pune Crime) त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 35 हजारांचे एक पिस्टल, 500 रुपयांचे एक जिवंत काडतूस आणि 12 लाख रुपये किमतीची एक कार जप्त केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.