Jejuri : सोमवती अमावस्ये निमित्त जेजुरी गड ‘यळकोट यळकोट जय मल्हारा’च्या जयघोषाने दुमदुमला

एमपीसी न्यूज : सोमवती अमावस्येनिमित्त (Jejuri) जेजुरी गड सजला होता. खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी होती.

भक्तांच्या ‘यळकोट यळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने जेजुरी गड दुमदुमला होता. भाविकांनी जेजुरी गडावर मोठ्या प्रमाणावर भंडाऱ्याची उधळण केली.

Pune Crime : पिस्टल बाळगल्या प्रकरणी चौघांना अटक, दरोडा विरोधी पथकाची कारवाई

त्यामुळे जेजुरी गडाला सोन्याचं रूप आल्याचं दिसून आले. खंडेरायाच्या मानाच्या पालखीचे गड उतरून कऱ्हा स्नानासाठी मार्गस्थ झाली. श्रींच्या उत्सवमूर्तीचे कऱ्हा स्नान झाल्यावर (Jejuri) परतीचा प्रवास सुरु झाला. सोमवती अमावस्येनिमित्त खंडेरायाचे लाखो भाविकांनी दर्शन घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.