Pune : गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन स्वरुपात मंडप परवाने मिळणार; महापालिकेतर्फे अर्ज करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने तसेच एक खिडकी पद्धतीने परवानगी देण्याची प्रक्रिया महापालिका शुक्रवारपासून सुरू करणार आहे. अर्जदारांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज व कार्यवाही करता येणार असल्याने अर्जदारांचा वेळ वाचणार आहे.

आगामी सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी उत्सवा निमित्त सार्वजनिक मंडळांना देण्यात येणार्‍या मंडप, कमानी परवानगी प्रक्रियेला महापालिकेतर्फे ५ जुलैपासून सुरुवात करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील ऑफलाईन सोबत ऑनलाईन स्वरुपात मंडप परवाने देण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या संकेतस्थळांवर जाऊन ऑनलाईन परवाना घेत येणार आहे. त्यासाठी पालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार असून १५ ऑगस्टपर्यंत या परवानग्या घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.