Pune Heavy Rain : पुण्यात पावसाचा हाहाकार; 80 ते 130 मिमी पावसाची नोंद

एमपीसी न्यूज : सोमवारी रात्री संपूर्ण पुणे शहरात विजेच्या गडगडासह (Pune Heavy Rain) पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. शहरातील जवळपास सर्वच भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. रस्ते तुंबले होते तर काही घरांमध्ये देखील पाणी शिरले होते. या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.


मुसळधार पाऊस आणि वीजांचा कडकडाट – अनेक रस्ते पाण्याखाली केल्याने नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले होते. सोमवारी रात्री अचानक सुरू झालेल्या या पावसाने पुणेकरांची चांगलीच घाबरगुंडी देखील उडाली होती. कारण मुसळधार पावसासोबतच विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू होता.


या भागात साचले पाणी – शहरातील सदाशिव पेठ, नवी पेठ, नारायण पेठ, स्वारगेट, कात्रज, कर्वेनगर या सोबतच पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. या पावसाने शहरात अनेक ठिकाणी पाणी शिरण्याच्या घटना घडल्या आहेत.


कोंढवा परिसरातील एनआयबीएम भागात (Pune Heavy Rain) अनेक ठिकाणी पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढले.


पुढील २० ठिकाणी भरले पाणी – येवलेवाडी स्मशानभूमीजवळ – सुखसागर नगर, अंबामाता मंदिर – कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड – रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ – सुखसागर नगर, डॉल्फिन चौक – बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर – हडपसर, गाडीतळ – शिवाजीनगर पोलिस मुख्यालय – मंगळवार पेठ, शिवाजी स्टेडियम – कसबा पेठ, फिश मार्केट जवळ – कुंभार वाडा समोर – नारायण पेठ, मोदी गणपती – औंध, डिएव्ही स्कुल गल्ली – कसबा पेठ, पवळे चौक – कसबा पेठ, भुतडा निवास – पर्वती, मित्रमंडळ चौक – गंज पेठ – भवानी पेठ तसेच ०१ ठिकाणी.


झाडपडीच्या घटना – पुणे सोलापूर रस्त्यावरील आकाशवाणी परिसरात झाड कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी अथवा जीवित हानी झाली नाही. अग्निशमन दलाकडे काल रात्री ०९.५७ वाजल्यापासून विविध प्रकारच्या वर्द्या प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये आज पहाटे ४ वाजेपर्यंत पाणी शिरणे किंवा जमा होणे अशा घटनांचा समावेश होता.


सीमा भिंतीचा भाग पडल्याची घटना पर्वती, रमणा गणपतीजवळ (Pune Heavy Rain) घडली. तसेच हडपसर, आकाशवाणी जवळ रस्त्यावर तर चंदननगर, बिडी कामगार वसाहत येथे रिक्षावर झाड पडले आणि पाषाण, लोयला स्कूल येथे दुचाकीवर झाड पडले होते. यामधे दलाची मदत पोहोचण्यापूर्वी जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला नागरिकांनी दवाखान्यात रवाना केले होते.


नागरिक अडकले पाण्यात – विशेष म्हणजे मंगळवार पेठ, स्वरुपवर्धिनी जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक कुटूंब पाण्यात अडकले होते. तेथील स्थानिक पल्लवी जावळे यांनी फोन अग्निशमन दलाला तातडीने माहिती दिली. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांना कळविताच तिथे अग्निशमन अधिकारी प्रदीप खेडेकर, तांडेल राजाराम केदारी, अनिल करडे व जवान छगन मोरे, शफीक सय्यद, हरिश बुंदेले, राजू जगदाळे, निलेश कर्णे, महेश गरड, मयुर कारले, चंद्रकांत मेनसे, राहुल जाधव, नवनाथ जावळे व चालक धीरज सोनावणे यांनी तेथील ०३ लहान मुली ०१ महिला व ०१ पुरूष अशा पाच जणांची सुखरूप सुटका केली.  यामधे तांडेल राजाराम केदारी यांनी लहान मुलींना खांद्यावर घेऊन येताच स्थानिकांनी त्यांचे आभार मानले.


कोंढवा खुर्द भाजी मंडई लगत एका ठिकाणी ०७ नागरिक पाण्यामधे अडकले होते. या सर्व ०७ जणांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी रश्शीचा वापर करून पाण्यामधे जात कोंढवा खुर्द अग्निशमन जवान निलेश लोणकर, रवि बारटक्के, नारायण मिसाळ, सुरज माळवदकर, सागर इंगळे, अनिकेत गोगावले व चालक दिपक कचरे यांनीही उत्तम कामगिरी केली.

Pune : पोलिसांच्या अडवणुकीमुळे सुटली तरुणाची गाडी; तरुणाने घडवली ‘अशी’ अद्दल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.