Pune : या शनिवारी घाट परिसरात जाणे टाळा, घाट परिसरात दरड कोसळण्याचा इशारा

एमपीसी न्यूज – कालपासून राज्यभरातून दरड कोसळण्याच्या (Pune) अनेक घटना समोर येत आहेत. इरशाळवाडी घटना तर अजून ताजीच आहे. याच दरम्यान चक्रवादळांचे संशोधक व अभ्यासक विनीत कुमार यांनी ट्वीट करत राज्यातील अनेक घाट परिसरात दरडी कोसळण्याचा धोका असल्याचे ट्वीट केले आहे. त्यामुळे या शनिवारी- रविवारी फिरण्यासाठी घाट परिसरात जाणे टाळा.

विनीत कुमार यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, IMD-GFS च्या ताज्या अंदाजानुसार 22 जुलै म्हणजे शनिवारी भीमाशंकर, लोणावळा, खंडाळा, कसारा, इगतपुरी, अंधारबन, ताम्हिणी, कुंडेलिका, भोर येथे पुन्हा जोरदार पाऊस पडू शकतो. त्यामुळे दरड कोसळण्याची शक्यता देखील वाढली आहे.

त्यामुळे शनिवारी घाट भागात जाणे टाळा. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे (Pune) ओलांडणे ठीक आहे, पण 23 जुलै रोजी पावसात लक्षणीय घट होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

Gold Rates – आजचे सोने-चांदी भाव; 24 कॅरेट सोन्याचा भाव  ₹ 300 ने खाली

मागील चार दिवसात राज्याच्या काही भागात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये सच्छिद्र दगड असतात. त्यामध्ये प्रमाणाबाहेर पाणी साठत आहे. त्यांचे ओझे वाढले, की दगड व गाळ असा सारा भाग खालच्या दिशेने वेगाने येत आहे.

भविष्यकाळात अशा घटना वाढण्याची शक्यता असल्याचे ही भाकीत डॉ. सतीष ठिगळे (1983 पासून पश्चिम घाटातील दरडीचे अभ्यासक) यांनी बीबीसी मराठीशी दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.