Pune Rain : पुण्यात पावसाचा पुन्हा येलो अलर्ट, पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे

एमपीसी न्यूज : मध्यतंरी पुण्यात झालेल्या गारा, वादळी वारे यानंतर (Pune Rain) उकाडा प्रचंड वाढला आहे. त्यात ढगाळ वाचावरणही मागील दोन दिवसांपासून पहायला मिळत आहे. यातच भर म्हणून पुणे वेधशाळेने पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे असून शहर व आसपासच्या परिसरात यलो अलर्ट जाहीर केला आहे. यात मुख्यता दूपारनंतर आकाश मुख्यतः ढगाळ आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता कायम राहणार आहे. 

पुण्यात काल सर्वाधिक पावसाची नोंद मगरपट्टा येथे 2.5 मिलीमीटर झाली तर सर्वाधिक तापमान चिंचवड येथे 36 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. रविवार (ता.7) तर शहरातील कमाल तापमानात वाढ होईल, तसेच अवकाळी पावसाची शक्यता कमी होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

राज्यातीलही कमाल तापमानाचा पारा हळूहळू वाढत आहे. गुरूवारी (ता. 4 राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहून, मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

IPL 2023 : हाय स्कोरिंग सामन्यात मुंबई इंडियन्स विजयी

नैर्ऋत्य मध्य प्रदेशापासून मराठवाडा, कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत (Pune Rain) समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडित वाऱ्यांची स्थिती आहे. कर्नाटक आणि तमिळनाडू परिसरासह दक्षिण छत्तीसगड आणि परिसरावरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.