Pune : ऑनलाईन पद्धतीने मोबाईल खरेदी करत कंपनीची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक

एमपीसी न्यूज – ऑनलाईन महागडे मोबाईल ऑर्डर करून (Pune) मोबाईल ऐवजी त्यात साबणाची वडी देत मोबाईल कंपनीची फसवणूक करणा-या टोळीस पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक 1 गुन्हे शाखा यांनी जेरबंद केले आहे.

याची माहिती मिळताच खंडणी विरोधी पथकाने कंपनीकडील लोकांना सोबत घेऊन सेनापती बापट रोड, पुणे येथील एका हॉटेलमधून अभिषेक हरिभाऊ कंचार (वय 20 वर्षे रा. ठाणे), धीरज दिपक जावळे (वय 21, रा. कल्याण पुर्व), आदर्श ऊर्फ सनी शिवगोविंद चौबे (वय 25 रा.डोंबिवली ईस्ट, ठाणे) अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 एप्रिल रोजी कोंढवा येथील ऑफ इंटरप्रायजेस कंपनीतील डिलिव्हरी बॉय यांना काही इसमानी ‘हम डिलीव्हरी बॉय है’ म्हणून पार्सल घेताना त्यास बोलण्यामध्ये गुंतवणून ठेवून पार्सल बॉक्समधील मोबाईल काढून घेवून त्या बॉक्समध्ये परत साबण्याच्या वड्या ठेवून बॉक्स तसाच पॅक करून पैसे न देता ती ऑर्डर परत करत फसवणूक करत होते.

Pune Rain : पुण्यात पावसाचा पुन्हा येलो अलर्ट, पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे

त्यानुसार पोलिसांना बातमी मिळताच पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकत आरोपींना अटक केली व त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून पोलिसांनी 98 हजार 500 रुपयांचे मोबाईल जप्त केले. याबाबत चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे पोलीस (Pune) उपनिरीक्षक विकास जाधव हे करीत आहेत.

हि कारवाई खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार मधुकर तुपसौंदर, प्रविण ढमाळ, सयाजी चव्हाण, रविंद्र फुलपगारे, हेमा देबे, नितीन कांबळे किरण ठवरे, अमोल आवाड, राजेंद्र लांडगे यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.