Chandrakant Patil : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना समज द्या, चलन फाडण्यात वेळ वाया घालवू नका

एमपीसी न्यूज : पुण्यातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मागील काही दिवसांपासून तर दररोज वाहतूक कोंडीच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे घराबाहेर पडायचं म्हटलं तरी आधी वाहतूक कोंडीच्या विचाराने नकोस होतं. आता तर दिवाळी खरेदीच्या निमित्ताने लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास लक्षात घेऊन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. वाहतूक पोलिसांनी आगामी दहा ते पंधरा दिवसाच्या काळात चलन फाडण्यात वेळ घालू नये असे आदेश दिले आहेत. 
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पुण्यातील विधान भवन या ठिकाणी जिल्हा आढावा बैठक घेतली. या बैठकीत बोलत असताना त्यांनी पुणे पोलिसांना निर्देश देत चलन फाडण्यात वेळ घालू नका, नियम मोडणाऱ्यांना बाजूला घेऊन समज द्या, असं स्पष्ट शब्दात सांगितले. त्यामुळे एक प्रकारे चंद्रकांत पाटील यांनी पुणेकरांना काहीसा दिलासा दिला आहे.
दरम्यान, दिवाळी सणाच्या खरेदी निमित्त मोठ्या संख्येने (Chandrakant Patil) नागरिक घराबाहेर पडत आहे. शहरातील अनेक भागात मुख्यत्वे लक्ष्मी रोड, टिळक रोड आणि संपूर्ण पेठांच्या परिसरात दररोज वाहतूक कोंडी होत असते. याचा ताण पोलिसांवरही येत असतो. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी तात्पुरता तोडगा म्हणून पोलिसांना चलन फाडू नका असे आदेश दिले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या या निर्देशामुळे वाहतूक समस्या सुटणार की वाढणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.