Pune : “दो धागे श्रीराम के लिये” उपक्रमाचे उद्घाटन – स्मृती इराणी

एमपीसी न्यूज – अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी (Pune)वस्त्र विणण्याच्या ‘दो धागे श्रीराम के लिए’ या उपक्रमाला आजपासून पुण्यात सुरुवात झाली.

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र, अयोध्या आणि पुण्यातील हेरीटेज हँडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी उपक्रमाचे पाहिले धागे धागे विणून सुरुवात केली.

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य मार्गदर्शक आणि (Pune)राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी, कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, हेरीटेज हँडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका अनघा घैसास यावेळी उपस्थित होत्या.

 

Nigdi : पतीवर वारंवार केलेले विषप्रयोग फसले म्हणून पत्नीने दिली पतीच्या खुनाची सुपारी

उद्घाटनानंतर 22 डिसेंबर पर्यंत पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील सौदामिनी हँडलूम या ठिकाणी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत नागरिकांना येऊन श्रद्धेचे व विश्वासाचे दोन धागे आपल्या रामलल्लासाठी येथे उपलब्ध करून दिलेल्या हातमागावर विणता येणार आहेत.

 

या उपक्रमात सहभागी सहभागी होण्यासाठी आयोजकांच्या वतीने सुरुवातीला नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. केंद्रीय व राज्यातील मंत्री महोदय उपस्थित आलेल्या या कार्यक्रमाकडे लोकांनी अक्षरशः पाठ फिरवल्याने, आयोजकांनी नाव नोंदणी करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे. तसेच कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.