Ind-SaT-20 :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द

एमपीसी न्यूज – दक्षिण आफ्रिकेतील (Ind-SaT-20)डरबन येथे होणारा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी-20 सामना टॉस न करताच पावसामुळे रद्द  करण्यात आला आहे.

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौ-याची सुरुवात अतिशय निराशजनक झाली आहे. पहिल्या टी-20 सामना सुरु होण्याआधीच पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला.

Pimpri : दुसऱ्या मातंगऋषी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गिरीश प्रभुणे

दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये (Ind-SaT-20)भारत 3 टी-20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. पहिल्या टी-20 सामन्यावर पावसाचे सावट आल्याने हा सामना रद्द करण्यात आला आहे. सेंट जॉर्जेस पार्क येथे भारताचा पुढील टी-20 सामना दक्षिण आफ्रीके सोबत 12 डिसेंबर रोजी होणार आहे. या सामन्यात पाऊसाची हजेरी लागेल का, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.