Today’s Horoscope 11 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज -आजचे पंचांग -Today’s Horoscope 11 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग-
आजचा दिवस – सोमवार.

तारीख – 11.12.2023.

शुभाशुभ विचार – क्षयतिथि.

आज विशेष – शिवरात्री.राहू काळ – सकाळी 7.30 ते 09.00

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – विशाखा 12.14पर्यंत नंतर अनुराधा.

चंद्र राशी – वृश्चिक.
—————————–
मेष – ( शुभ रंग – क्रीम)
कामाच्या ठिकाणी विरोधक चुका काढण्यासाठी टपून बसलेत. वरिष्ठांचे काही केले तरी समाधान होणे शक्य नाही. आज धाडसाची कामे टाळा. नाकासमोर चाला.

वृषभ ( शुभ रंग- पिस्ता)
केवळ मोठेपणासाठी आज न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न आज करा. कार्यक्षेत्रात यशाचा मार्ग सोपा होईल.

मिथुन – ( शुभ रंग- पांढरा)
आज तुम्ही काही आरोग्याच्या तक्रारींनी त्रस्त असाल वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज वैवाहिक जीवनातील काही मतभेद संध्याकाळी नीवळतील. शब्द जपून वापरा.

कर्क – ( शुभ रंग – हिरवा)
दुकानदारांची उधारी वसूल होईल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा दिसून येईल. आज वैवाहिक जीवनात जुन्या फोटोंचा अल्बम चाळणे हिताचे राहील.

सिंह -( शुभ रंग – निळा)
हौशी मंडळी आज जीवाची मुंबई करण्यासाठी पैसा खर्च करतील. आज गृहिणी घर सजावटीस प्राधान्य देतील. कलाकारांना मात्र प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.

कन्या – ( शुभ रंग- राखाडी)
वास्तु व वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार आज टाळले तर बरे होईल. गृहिणींना आज माहेरीची ओढ लागेल. विद्यार्थी आज अभ्यासापेक्षा खेळातच रमतील.

तूळ ( शुभ रंग- आकाशी)
आज तुम्ही उत्साही व आनंदी असाल. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पहाल. कार्यक्षेत्रात तुमचे वक्तृत्व कमी येईल. नेतेमंडळी सभा गाजवतील. आनंदी दिवस आहे.

वृश्चिक ( शुभ रंग – डाळिंबी)
आज आपल्याच मनाप्रमाणे वागाल. थोडी अहंकाराची बाधा होऊ शकते. कठोर बोलण्याने नाती दुरावण्याची शक्यता आहे. कुणाला मोफत सल्ले वाटप करू नका.

धनु (शुभ रंग- जांभळा)
काही जणांना आज तातडीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. घरात थोरांच्या शब्दाला मान द्यावा लागेल. एखादी हरवलेली वस्तू दुपारनंतर परत शोधल्यास सापडेल.

मकर- ( शुभ रंग – मरून)
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज थोडी अनावश्यक खरेदी ही होईल. आज लांबच्या प्रवासात बेसावध राहू नका.

कुंभ – (शुभ रंग- भगवा)
आळस झटकून कामाला लागाल. पण अति उत्साहात आज काही चुकीचे निर्णय घ्याल. हाती असलेला पैसा जपून वापरा. भावनेच्या भरात कुणालाही शब्द देऊ नका.

मीन ( शुभ रंग- गुलाबी)
कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तयारी ठेवावी लागेल. आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल. महत्त्वाच्या चर्चेत सुसंवाद साधावा.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.