Pune : राज्य शासनाच्या दिनविशेष यादीमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा समावेश; अमोल कोल्हे यांच्या मागणीला यश

एमपीसी न्यूज : खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्या मागणीला यश (Pune) आले असून राज्य शासनाच्या राष्ट्रपुरुष/थोर व्यक्ती दिनविशेष यादीमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा समावेश करण्यात आला असून या पुढे सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयांत शंभूराजांची जयंती साजरी करण्यात येणार आहे.

थोर महापुरुषांच्या दिनविशेष यादीत छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करावा अशी मागणी 2020 साली खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली होती. या मागणीला अखेर दोन वर्षानी यश आले आहे.

काय होती मागणी? – Pune

राज्य शासनाने बनवलेल्या थोर महापुरुषांच्या दिनविशेष यादीत छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र, राज्य सरकारने त्वरित या बाबतीत लक्ष घालून सुधारणा करावी, अशी विनंती खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी केली होती. डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही बाब राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिली.

“महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान न विसरता येण्यासारखं आहे. मात्र, सरकारनं बनविलेल्या थोर महापुरुषांच्या दिनविशेष यादीत संभाजी राजेंच्या नावाचा उल्लेख नाही. यात सुधारणा व्हायला हवी,” असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले होते. त्यांच्या या मागणीला यश आले असून सर्वत्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर अमोल कोल्हे यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.