Pune : पुणे विद्यापीठाचा 121 वा पदवीदान समारंभ 27 जानेवारी रोजी होणार संपन्न

एमपीसी न्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा (SPPU) 121 वा पदवीदान समारंभ 27 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळील लॉनवर हा समारंभ(Pune)  दुपारी 4 वाजता होणार आहे.

राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती भगतसिंग कोश्यारी अध्यक्षीय भाषण करतील, तर संरक्षण मंत्रालयातील संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. सतीश रेड्डी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांच्यासह विद्यार्थी व विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

Pune Bomb Blast : पुणे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला दुसऱ्यांदा जामीन मंजूर

एकूण 968 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. परिक्षा (Pune) विभागाचे कुलगुरू आणि परिक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ.अनिल लोखंडे म्हणाले की, या समारंभात 110 पीएचडी विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणार असून उर्वरित विद्यार्थ्यांना त्यांच्या पदव्या पोस्टाने मिळणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.